एका कार्यक्रमादरम्यान मुंबई येथे राज ठाकरे विना मास्क दिसले होते. त्यांना विचारणा केली असता ते म्हणाले मी मास्क घालतच नाही. यानंतर नाशिक मध्ये देखील माजी महापौर अशोक मुर्तडक यांना राज ठाकरेंनी मास्क काढण्यासाठी सांगितलं होतं.
सरकार कडून मास्क घालण्याची सक्ती करण्यात येत आहे. परंतु मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मास्कचा वापर न करता, न घालण्याचे अवाहन करीत आहे. त्यांच्या या आवाहनामुळेच राज्यात कोरोना वाढल्याची तक्रार शहरातील एका वकिलाने क्रांती चौक पोलीस ठाण्यात केली आहे.
राज ठाकरेंसारखा जबाबदार नेत्या कडून मास्क न घालावे असे आवाहन केल्या जाते. त्यांचा अनुनय करणाऱ्यांचं प्रमाण मोठं आहे. राज ठाकरेच मास्क घालू नका, असं सांगत असतील तर तर लोक त्याला का फॉलो करणार नाहीत, असा सवाल तक्रारकरते ऍड. रत्नाकर चौरे यांनी उपस्थित केला.
राज ठाकरे हे मास्क न घालावे असे आवाहन करत असल्यामुळे राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचं रत्नाकर चौरेंनी तक्रारीत म्हटलं आहे.
राज ठाकरेच मास्क घालू नका, असं सांगत असतील तर तर लोक त्याला का फॉलो करणार नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. साथीचे रोग प्रतिबंधात्मक कायद्याखाली राज यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीदेखील त्यांनी केली.