गुलटेकडी मार्केट यार्डात रविवारी भाजीपाला, फळे, किराणा, धान्य खरेदीसाठी मोठी गर्दी उसळलेली होती. गुढीपाडव्यासाठी आंबे, फुले आणि किराणा खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
गेल्या काही दिवसांपासून बाजार सुरुळीत सुरू होता. परंतु आज गर्दीमुळे कुठे काय चालू आहे काहीही समजत नाही. नागरिक पंधरा दिवसांच्या भाजीपाला, फळे खरेदी करत आहेत.
बाजार समिती कर्मचारी सकाळ पासून गर्दी कमी करणे, वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी करत आहेत. परंतु गर्दी मोठ्या प्रमाणावर झाल्याने त्यांची ही दमछाक झाली आहे.