खरतर मनावर खूप मोठा दगड ठेऊन मी ही भावनिक साद घालण्याचा प्रयत्न करतोय. आपण सर्रास म्हणतो की आपली पुरुषप्रधान संस्कृती आहे. पण जर या पुरुषप्रधान संस्कृती मध्ये जर कुटुंबात पुरुषच नाही राहिला तर.? विचार करणे ही कठीणच अस आपल्याकडे खूप ठिकाणी असेलही मला कल्पना नाही, पण माझ्या गावातील एक खूप दुर्दैवी घटना आहे, अशी घटना घडू नये.
एक परिवार होता, छोटे कुटुंब सुखी कुटुंब या प्रमाणे घरात हम दो हमारे दो या उपाधी प्रमाणे कुटुंबात आई-वडील आणि मुलगा-सून असा सुखी संसार चालला होता. घर खर्च किंवा वार्षिक अन्य धन्य पुरेल इतकी दोन ते अडीच एकर जमीन.. मुलगा मुंबई ला मिस्त्री काम करायचा पण महागाई वाढल्याने मुंबई सोडून पुन्हा गावाकडे परतला. मग इकडे आल्यावर मिळेल ते काम करून कुटुंब सुखात जगत होते.कालांतराने कुटुंबात भर पडली घरात खूप दिवसांनी पाळणा हालला एक मुलगा झाला म्हणून समाधान झाले म्हणून मुलाचे नाव #समाधान’च ठेवले. खुशीने व अतिशय गुण्या गोविंदाने प्रपंच चालला होता.समाधान आता 3 वर्षाचा झाला आणि पुन्हा नवीन पाहुण्यांची चाहूल लागली, सगळं काही ठीक ठाक चालू होते पण नियतीच्या मनात काळं..!
समाधान चे वडील घरातील जबाबदारी व्यक्तिमत्त्व भास्कर चौधरी यांनी आत्महत्या केली..! एकुलता एक मुलगा अन त्यानेही मागचा पुढचा विचार न करता मृत्यू ला कवटाळले. समाधान ला नुकतेच वडील कळायला लागले अन लगेच हा प्रसंग आला. या घटनेने कुटुंबावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. घरातील कर्त्या धर्त्या माणसाने असं केल्याने परिवारात खुप काळोख पसरला होता. या घटनेला आज जवळपास 15 वर्षे होत असेल..
आता संपूर्ण जबाबदारी ही पुन्हा वडिलांकडे म्हणजे समाधान च्या आजोबाकडे आली. त्यांना घरात बाबा म्हटलं जायचं..! समाधान च सर्व जग हे बाबांनी हळू हळू पुढे चालवलं होतं, त्यात पुन्हा त्या नवीन पाहुण्यांनी भर घातली. मुळात म्हणजे समाधानला वडील कळायला लागले होते तेव्हा वडिलांचं छत्र हरपलं अन दुसरा मुलगा अनिल याला बापाचा कधी चेहराही पहिला नव्हता. जे काय ते बाबांचेच बोट धरून दिवस चालले होते, आता कुठं थोडासा मुलाच्या (भास्कर) दुःखाचा विसर पडत चालला होता,पुन्हा त्यात संकटाची वाढ झाली. भास्कर ची आई , समाधान-अनिल ची आजी अर्थात बाबांची बायको, यांना पोटातील कर्करोगाने ग्रासले. पण ही बाब गावातील त्यांच्या नेहमीच्याच संबंधातील एका सुशिक्षित शेतकऱ्यांच्या लक्षात आली. नाव त्यांचं #शिवाजी_चौधरी, यांनी वेळेत जीवाची पर्वा न करता धावपळ करत वेगवेगळ्या योजनेअंतर्गत उपचार करून त्या संकटावर नियंत्रण मिळवले. याला कारण म्हणजे त्या आजी आजोबांनी जवळपास अर्ध्याहून अधिक आयुष्य शिवाजी चौधरी यांच्या शेतात सालं घालण्यात घालवलेले होते. आता भास्कर नंतर #शिवा/शिवाजी हे नाव त्यांच्या तोंडात भिजून गेले होते. काहीही व्यक्त करायचं तर शिवा, काही अडचण सांगायचं तर शिवा, मुलापेक्षा वेगळं त्यांनी शिवाला कधी मानलच नाही. सुख, दुःख,अडचणी, व्यवहार, गावातील चर्चा जे काय ते शिवाच…! इथपर्यंत की छोट्या मोबाईल मध्ये काही मॅसेज जरी आला तरी, शिवा पहाय बर हे काय आलं तर…. अशी सरळ सरळ मुलगा आणि वडील यांच्याप्रमाणे त्यांची वागणूक..
आता आजोबांचं खूप वय झालं होतं गेल्या दोन महिन्यांपासून ते बिना अन्न पाण्याचे एका जागी पडून होते, आणि काळाने आता त्यांच्यावर घाला घातला. आत्ताच काही दिवसांपूर्वी #तेजराव बाबुराव चौधरी यांचं वृद्धापकाळाने निधन झाले आणि घरातील पुरुषत्व संपुष्टात आले. समाधान आणि अनिल यांचे बाबा आता या जगातून हरपले, घरात आता राहिले ते ८० वर्ष्याच्या घरातील आजी पद्मावती (काकू) विधवा सून इंदूबाई आणि समा-आणू..! घरात कर्तृत्ववान पुरुष असं कोणीच दिसत नाही.
पुढे त्यांचं कसं होणार ? हा प्रश्न खूप दिवसांनी मनाला भेदसवतोय. #समाधान आता #आठवीच्या वर्गात एका संस्थेच्या शाळेत तर #अनिल सहावीच्या वर्गात त्याच शाळेत शिकत आहे.. यापैकी समाधान चा बारावी पर्यंत चा सर्व शैक्षणिक खर्चाची जबाबदारी मी स्वतः घेतली आहे. तर अनिल चा बुद्धिगुणांक उच्च असल्याने त्याच्या शैक्षणिक पालकत्वाची जबाबदारी मी एखाद्या सुशिक्षित आणि सामाजिक बांधिलकी असलेल्या एखाद्या व्यक्तीला सोपावण्याचा प्रयत्न करत आहेत, याबद्दल मी डॉ. हेडगेवार रुग्णालया अंतर्गत असलेल्या सावित्रीबाई फुले महिला एकात्म मंडळ या संस्थेच्या संचालिका आईसम डॉ फाटक मॅडम याच्याशी व आमच्या गावच्या जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक कीर्तिकर सर यांच्याशी ही बोलणं झालं, तर दोघांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला, फुल ना फुलांची पाकळी मदत करू असे त्यांनी सांगितले.
तर समाजातील सामाजिक बांधिलकी असलेल्या सर्व नागरिकांना मी विनंती व आवाहन करतो की अनिल ची शैक्षणिक जबाबदारी निस्वार्थ भावनेने स्वीकारावी… जबाबदारी स्वीकारलेल्या त्या व्यक्तीचे ऋण त्या दोन्ही महिला आणि मी कधीच विसरणार नाही… दुःखाचा वाटा उचलावा अशीच विनंती.. परिस्थिती व्यक्त करण्यात खूप कसर राहिली आहे, वास्तविक पाहता खरंच खूप बेताची परिस्थिती आहे..
आभार..!!!
लेखक:
तेजराव बाबांनी बांधलेल्या औताच्या झोळणीत वाढलेला मी-
निलेश चौधरी पाटील
7767873206