देशासाठी ऐतिहासिक क्षण, अदर पुनवालांकडून करण्यात आले ‘हे’ ट्विट

32

राज्यात कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. हि कोरोनाची लस तयार केलेल्या पुण्याच्या सीरम इनस्टिट्यूटमधून लसीच्या वाहतुकीला सुरुवात झालेली आहे. कोरोना लस देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये पोहोचवली जाणार आहे. यासाठी टप्प्याटप्प्याने शहरांची निवड केली आहे. या पार्श्वभूमीवर सीरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांनी एक भावनिक क्षणाची ट्वीटरवर पोस्ट केली आहे. तर अदर पुनावाला यांची ही पोस्ट ऐतिहासिक क्षणांची साक्षीदार ठरणारी आहे.

या कोव्हिशिल्ड लसीची पहिली मालवाहतूक देशातील विविध ठिकाणी पाठवण्यात येत आहे. सीरम इनस्टि्टयूटच्या अधिकाऱ्यांनी कोरोना लसीचा एक डोस 200 रुपयांना देण्याचे जाहीर केले होते. सुरुवातीला सीरमकडून 1 कोटी 10 लाख डोस पुरवठा करण्यात येणार आहे.

हा सीरम इनस्टिट्यूटच्या संपूर्ण टीमसाठी हा एक भावनिक क्षण आहे, अशी पोस्ट सीरम इनस्टिट्यूटचे अदर पुनावाला यांनी लिहिली आहे. विशेष म्हणजे या पोस्टसोबत अदर पुनावाला यांनी सीरम इनस्टिट्यूटच्या संपूर्ण टीमचा एक फोटो पोस्ट केला आहे. तसेच दुसऱ्या एका फोटोत स्वत: अदर पुनावाला हे कोरोना लस ठेवण्यात आलेल्या ट्रकमध्ये बसलेले आहेत.

दरम्यान, सर्वसामान्यांना लस कधी मिळणार याचा निर्णय केद्र सरकार घेणार आहे. पहिले तीन टप्पे झाल्यानंतर सर्वसामान्यांना लस देण्यात येतील. केंद्र सरकारने लसीकरणाचा कार्यक्रम त्यांच्या अखत्यारित राबवावा. अठरा वर्षांपेक्षा कमी वय असणारे, गरोदर महिला आणि अ‌ॅलर्जी असणाऱ्यांना लस देण्यात येणार नाही, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.