शरद पवारांच एक पत्र अन खतांच्या किंमतीत घट

28

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी केंद्रीयमंत्री सदानंद गौडा यांना पत्र पाठवून खतांची दरवाढ मागे घेण्याची विनंती केली होती. शरद पवारांच्या या पत्राची दखल केंद्र सरकारने घेतली आहे.

खुद्द शरद पवार यांनीही या दरवाढीची दखल घेत केमीकल आणि फर्टीलायजर मंत्री सदानंद गौडा यांना पत्र लिहून शेतकऱ्यांची व्यथा मांडली होती. तसेच, या दरवाढीकडे आपण गांभीर्याने पाहून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी विनंतीही केली होती.

केंद्र सरकारने यासंदर्भात डाय अमोनियम फास्फेट (डीएपी) खतावरील सब्सिडी 140 टक्क्यांनी वाढवली असल्याचेही एका निवेदनात म्हणण्यात आले आहे.DAP खतासाठी असलेली 500 रुपये प्रति बॅग सब्सिडी वाढवून, आता 1200 रुपये प्रति बॅग करण्याचा ऐतिहासिक निर्णय सरकारने घेतला आहे. 

एकाच दिवसात खतांच्या किंमती कमी करण्यात आल्या आहेत. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी एनसीपीच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन माहिती दिली आहे.