जमावबंदीच्या आदेशांना पायदळी तुडवत अमरावतीत कामगार, व्यापार्‍यांचा भव्य मोर्चा

5

राज्यभरात कोरोना संसर्गाचा प्रसार वेगाने होतो आहे. त्यामुळेच संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध आणले आहेत. परंतू हे निर्बंध नसून टाळेबंदी सदृष्य चित्र आहे आणि यामुलके व्यापारी तसेच हातावर पोट असणार्‍या वर्गाचे मोठ्याप्रमाणात नुकसान होणार असल्याने या वर्गातून सरकारवर नाराजी व्यक्त केली जात आहे. अमरावतीमध्ये शासनाच्या या नविन नियमावलीविरोधात कामगारांनी एकत्र येत थेट मनपावर भव्य मोर्चा काढला आहे.

अत्यावश्यक सेवे वगळता ईतर सर्व दुकाने ३० एप्रील पर्यंत बद असणार असा निर्णय सरकारने जाहीर केला. मात्र या निर्णयामुळे मोठ्यप्रमाणात नुकसानाच सामोरे जावे लागणार आहे. तसेच अमरावतीत गेल्याच महिन्यात १५ दिवसांचा लॉकडाऊन लावण्यात आला होता. त्यामुळे अगोदरच नुकसान झालेले होते. आता पुन्हा ही टाळेबंदी असह्य झाल्यामुळे कामगारांनी थेट मनपावर मोर्चा धडकवत या निर्णयाचा निषेध नोंदवला आहे.

शहारील राजकमल, जयस्तंभ, चित्रा, ईर्वीन या व ईतर मुख्य चौकांतील कामगार, दुकानदार नियमितपणे आपली प्रतिष्ठाने ऊघडण्यास आली होती. मात्र शासनाच्या या निर्णयामुळे त्यांना आपली दुकाने बंद करावी लागली. परिणामी या निर्णयाचा संताप व्यक्त करीत कामगारांनी एकत्र येत हा मोर्चा काढला. यावेळी कामगारांनी मनपा प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती चढवली. माजी महापौर विलास ईंगोले यांनी समजुत काढल्यानंतर काहीशे वातावरण निवळले होते.

महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या नविन नियमावलीवर व्यापारी वर्ग तसेच कामगार, मजुरवर्ग प्रचंड नाराज आहे. गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमुळे अगोदरच नुकसान झालेले आहे. त्यामध्ये ही भर म्हणजे जगावे की मरावे असा प्रश्न निर्माण करणारे आहे.