भंडाऱ्यात नवजात बालकांच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर; मोदींनी केले दुःख व्यक्त

35

महाराष्ट्राच्या भंडारा जिल्ह्यात शुक्रवारी रात्री बालकांच्या दक्षता विभागाला लागलेल्या आगीत होरपळून 10 बालकांचा मृत्यू झाला आहे. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये ही घटना घडली आहे. मध्यरात्री जवळपास दोनच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली होती. धुरामुळे गुदमरुन या बालकांचा मृत्यू झाल्याचं समजत आहे. या युनिटमध्ये एकूण सतरा बालके होती. त्यापैकी सात जणांना वाचवण्यात यश आलं आहे. नवजात बालकांचं वय एक महिने ते तीन महिन्यांचं होतं, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

नवजात बाळांच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्याबद्दल सहवेदना व्यक्त करतो. जिल्हा सामान्य रुग्णालयातील आऊटबॉर्न युनिटमधून रात्री दोनच्या दरम्यान अचानक धूर निघत असल्याचं समोर आले. ड्युटीवर असलेल्या नर्सने दार उघडून बघितले असता त्या रुममध्ये मोठ्या प्रमाणात धूर होता, त्यामुळे त्यांनी लगेच रुग्णालयातील अधिकाऱ्यांना सांगितले. मला आशा आहे की जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत’ अशी भावना पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली.

सकाळी बाळाच्या आईने माझ्या बाळाला एकदा मला पाहू द्या, अशी आर्त हाक रुग्णालय प्रशासनाला घातली होती. जिल्हा शल्य चिकित्सकांच्या कार्यालयाबाहेरच या नातेवाईकांनी आपला हंबरडा फोडला होता. पण त्यांना आपल्या बाळांना पाहता आले नाही.

तर भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीत सुमारे 10 बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आणि मनाला व्यथित करणारी आहे. या सर्व कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेची तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.