राज्यातील राजकारणाला नवे वळण; ‘या’ नेत्याला उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता

130

प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची निवड झाल्यानंतर आता काँग्रेसमध्ये मोठे फेरबदलाचे वारे वाहत आहे. तसेच महत्त्वाची बातमी म्हणजे नितीन राऊत यांना उपमुख्यमंत्री पद मिळण्याची शक्यता आहे. नाना पटोले आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत दिल्ली दरबारी दाखल झाले असून मंत्रिपद मिळणार का? अशी चर्चा रंगली आहे. तसेच नितीन राऊत यांच्याकडेही नवीन जबाबदारी देण्याची शक्यता आहे.

तर नितीन राऊतांचे खाते पटोलेंकडे जाण्याची शक्यता आहे. पटोले, राऊत यांची राहुल गांधींसोबत चर्चा झाल्याची माहिती पुढे येत आहे. प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नाना पटोले हे काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठी पोहोचले आहे. राहुल गांधी यांची त्यांनी भेट घेतली आहे. पटोले यांनी आपल्याला मंत्रिपद द्यावे अशी मागणी केली होती. त्यामुळे काँग्रेस हायकमांडकडून राज्यात खांदेपालट केली जाण्याची शक्यता आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मंत्री नितीन राऊत यांनी आज सोनिया गांधी यांची भेट घेतलीय. या भेटीमुळे मंत्रीमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यावेळी नाना पटोले झी २४ तास सोबत बोलताना म्हटले की, मंत्रीपद देण्याचा अधिकार पपक्षश्रेष्ठींचा आहे. खुर्ची मिळाली तर न्याय देण्याचा माझा स्वभाव आहे. पक्षात लोकशाही असल्याने नितीन राऊत आणि मी भेटलो.