प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचा सुधारित आदेश येत्या चार दिवसात काढण्यात येणार

66

प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष राजाराम वरुटे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आज मंत्री मुश्रीफ यांची शिक्षक बदली संदर्भात भेट घेतली. शिक्षक बदली आदेशात सुधारणा करावी अशी विविध संघटनांनी मागणी केली होती.

यावेळी शिष्टमंडळात शिक्षक बँकेचे अध्यक्ष प्रशांत पोतदार,संचालक जी.एस.पाटील,संभाजी बापट, बाजीराव कांबळे,प्रवीणअंगज,तुकाराम राजूगडे आदी उपस्थित होते.

प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचा सुधारित आदेश येत्या चार दिवसात काढण्यात येईल असे आश्वासन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.ग्रामविकास विभागाने पाच अधिकाऱ्यांचा बदली अभ्यास गट स्थापन करून सुधारित आदेश तयार केला आहे.

मुश्रीफ यांनी ग्रामविकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तात्काळ संपर्क केला व शिक्षकांच्या बदल्यांचे सुधारित आदेश त्वरित काढण्याचे आदेश दिले.