प्रसिद्ध दिग्दर्शक मीरा नायर दिग्दर्शित आणि बीबीसी यांनी निर्मित केलेल्या ‘अ सुटेबल बॉय’ या नव्या वेबसिरीजला प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली आहे. ही वेबसिरीज काही दिवसांपूर्वी नेटफ्लिक्सवर प्रसिद्ध झाली होती. पण आता या सिरीजमधील काही दृश्यांवर आक्षेप घेण्यात आला आहे. लव्ह जिहादला पाठिंबा दिल्याचा आक्षेप केला आहे.
सध्या ट्विटरवर हॅशटॅग बॉयकॉट नेटफलिक्स (#boycott Netflix) देखील ट्रेंड होत आहे. लता मेहेरा आणि कबीर दूर्रानी ही दोन पात्रे मंदिराच्या परिसरात एकमेकांना चुंबन करताना एका एपिसोडमध्ये दाखवण्यात आला आहे. या सर्व दृश्यांवर भाजपचे गौरव तिवारी यांनी आक्षेप घेतला आहे. तीन महिन्यांपूर्वीच ही सिरीज इंग्रजीमध्ये आली होती. त्यावेळी याबाबत काही वाद झाला नाही. पण आता ही सिरीज हिंदी भाषेत आल्यानंतर मात्र यावर खूप वाद निर्माण झाले आहेत. हि वेब सिरीज भारत स्वातंत्र्य झाल्यानंतरच्या काळावर आधारित असल्याचे दिसत आहे. यामध्ये प्रेमकथा दाखवण्यात आली आहे.
यामधील चुंबनाच्या दृश्यावर भारतीय जनता पक्षाचे गौरव तिवारी यांनी आक्षेप घेत तक्रार केली आहे. यामुळे ट्विटरवर देखील काही जणांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या वेबसिरीजमधला दाखवण्यात आलेले सीन हे आपल्या संस्कृतीच्या विरोधात आहेत असं अनेकांचं म्हणणं आहे. यामध्ये मुस्लिम मुलगा हिंदू मुलीचे चुंबन घेतो याला लोकांचा आक्षेप नाही परंतु हा सीन चित्रित होणारी जागा ही हिंदू मंदिर आहे. यामध्ये एकाच ठिकाणी तीन वेळा चुंबन दृश्य दाखवण्यात आले आहे. या प्रकरणी नेटफलिक्स आणि सिरीजचे निर्माते काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाच आहे.