वर्षानुवर्षे काम करणाऱ्या वाजत्रींना मालकांनी वर्षभर कसाबसा आधार दिला आहे. आता गाडीचे हप्ते भरायला पैसे नाहीत, तिथे वाजंत्री म्हणून काम करणाऱ्या कामगारांना सांभाळणे शक्य नसल्याचे वाजंत्री मालकांनी सांगितले आहे.
कोरोनामुळे शासनाने लग्नकार्य, सण, उत्सव व मिरवणुकांवर निर्बंध लादल्याने बँजो पार्टी, ब्रास बँड व्यवसाय वर्षभरापासून ठप्प झाला आहे. या व्यवसायात असणाऱ्या पार्टीचालकासह वाजंत्रींवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने अनलॉक प्रक्रियेतूनही या व्यवसायाला वगळले असल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे.
ब्रास बँड संघटनेचे तालुकाध्यक्ष रोहित सरवार यांच्या अध्यक्षतेखाली या संदर्भात झालेल्या बैठकीत तालुक्यातील ब्रास बँड पार्टीचे चालक-मालक व वाजंत्रीवाले उपस्थित होते.
यावेळी तालुका सरचिटणीस दीपक खरात, मधुकर माळी, योगेश दौंड, राजू पटेल, सोमनाथ मेंगाळ, अन्सार शेख, संतोष उघडे, काळू घेगडमल यांच्यासह बँड पार्टीचालक व वाजंत्रीवाले या वेळी उपस्थित होते.