अमीर खानची मुलगी इरा खान सोशल मिडियावर नेहमी चर्चेत असते. ती चाहत्यांसोबत अनेक गोष्टी नेहमी शेअर करत असते. तिने अजून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले नसले तरीही तिचे सोशल मिडियावर भरपूर फॅन्स आहेत. काही दिवसांपूर्वी इराच मिशाल कृपलानीसोबत ब्रेकअप झाल्याच्या चर्चा सुरू होत्या. 23 वर्षाच्या इराने आपल्या ब्रेकअपबाबत इन्स्टाग्रामवर पोस्ट देखील केली होती. आता पुन्हा एकदा इरा प्रेमात पडल्याच्या चर्चा सुरू आहेत.
लॉकडाउनच्या काळापासून इरा आणि नुपूर शिखर हे एकमेकांना डेट करत होते. इरा जेव्हा फिटनेसकडे वळली तेव्हा त्या दोघांची जवळीक वाढत गेली. सुट्ट्यांमध्ये दोघे अमीर खानच्या फार्महाऊसवर महाबळेश्वरला गेले होते. इराने आपल्या आईला देखील नुपूर बद्दल सांगितले होते. तसेच दोघांनीही एकमेकांच्या आईची भेट घेतली आहे. दोघेही या नात्याबाबत सिरियस आहेत असे म्हंटले जात आहे. यापूर्वी इरा आणि नुपूर यांनी एकत्र दिवाळी देखील साजरी केली आहे. ते दोघे एकमेकांना 5 महिन्यांपासून डेट करत आहेत.
नुपूरने काही दिवसांपूर्वी त्याच्या सोशल मिडिया अकाउंटवरून त्याच्या आईचा फोटो शेअर केला होता. ज्यावर इराने सुंदर कमेंट सुद्धा केली होती. नुपूर शिखर सेलेब्रिटी फिटनेस कोच आहेत. सध्या ते इरासोबत, अमीर खान आणि सुश्मिता सेन यांना प्रशिक्षण देत आहेत.