अबब ! ग्रामपंचायत बिनविरोध करा आणि गावच्या विकासासाठी घ्या तब्बल ५० लाख, ‘या’ मंत्र्याची ऑफर

11

ग्रामपंचायत बिनविरोध निवडून दिल्यास, आमदार निधीतून त्या गावाला 25 लाख रुपये देण्याचा निर्णय पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी घेतला आहे. ग्रामपंचायत बिनविरोध निवडणूकिमुळे गावचा संघर्ष कमी होईल, आणि गावचा विकास यातून साधता येईल, असे आमदार लंके म्हणाले होते.

त्यानंतर अनेक आमदारांनी अशा ऑफर द्यायचा धडाका सुरू केला आहे. त्यानंतर मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांनीही अशीच ऑफर दिली होती. त्यानंतर आता चक्क राज्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनीही ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केल्यास स्वतच्या शिरूर मतदारसंघातील गावांना तब्बल ५० लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.

गावचे गट तट विसरून ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्यास आपापसांतील कटुता संपेल असे राजेंद्र पाटील म्हणाले. असं झाल्यास गावचा विकास साधता येईल, गावाची एकता कायम राहील. ग्रामपंचायत निवडणुका स्थानिक पातळीवर होतात. त्यात पक्ष वैगेरे नसतो. त्यामुळे सामाजिक एकोपा टिकवून ठेवायचा असेल तर बिनविरोध निवडणूक होणं गरजेचं आहे असं राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले. त्यांच्या या आवाहनाला किती ग्रामपंचायत प्रतिसाद देतात ते पाहणं औतसुक्याचं ठरेल.