औरंगाबादेत १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर पुण्यामध्ये लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणाला बुधवारी ( दि २४ ) रोजी वाळूज एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. सदरील तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिडीत तरुणी वडिलांचे निधन झाले असल्याने रांजणगाव परिसरात आपल्या मावशीकडे राहते. मावशी आणि काका कामासाठी बाहेर गेले असता, मुलगी बेपत्ता असल्याचं घरमालकाने मावशी काकांना संपर्क करून कळवले. शोधूनही पिडीत मुलगी न सापडल्याने, मावशीने पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
सदरील अल्पवयीन मुलीला आरोपीने आमिष दाखवून पळवून नेले असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाले. आरोपीने पीडितेला पुण्यात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. काही दिवस तिथे राहिल्यानंतर पैसे संपल्याने आरोपी पीडितेला घेऊन वाळूज एमआयडीसी परिसरातील आपल्या घरी आला. त्यावेळी पोलिसांनी आरोपीच्या तावडीतून पिडीतेची सुटका केली.
आरोपी विरोधात बलात्काराचा गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली तर पिडीत अल्पवयीन मुलीला बाल सुधार गृहात पाठवण्यात आले आहे.