मुख्य परीक्षेस उपस्थित असूनही लागली अनुपस्थिती:सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा भोंगळ कारभार

48

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच विद्यापीठांनी अंतिम वर्षाची मुख्य परीक्षा ऑनलाइन पध्दतीने घेतली होती.परंतु परीक्षेस उपस्थित राहूनही अनुपस्थिती लागल्याची घटना समोर आली आहे.बारामतीतील टीसी महाविद्यालयात अंतिम वर्गात शिकणारी प्रतीक्षा हणमंतराव धायगुडे या विद्यार्थिनींचे ऑनलाइन परीक्षेमध्ये झालेल्या तांत्रिक अडचणीमुळे नुकसान झाले आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ऑक्टोबर महिन्यात अंतिम वर्षाची परीक्षा घेतली होती. प्रतीक्षा धायगुडे ही बीएस्सी (भौतिकशास्त्र) विभागात शिक्षण घेत होती. तिने २४ ऑक्टोबरला फिझिक्स ऑफ नॅनोमटेरियल सायन्स या विषयाचा पेपर दिला होता. या विषयाच्या पेपरला ती उपस्थित असूनही तिची अनुपस्थिती लागली आहे. १२ नोव्हेंबरला विद्यापीठाने निकाल जाहीर केला.त्यात त्या विषयाला अनुपस्थित असे दाखवले होते.त्यानंतर तिने त्यासंदर्भात महाविद्यालयाशी संपूर्ण केला.महाविद्यालयाकडून तिला विद्यापीठाशी संपूर्ण करण्यास सांगितले. १३ नोव्हेंबरला तिने विद्यापीठाला त्यासंदर्भात मेल पाठविला. पण विद्यापीठाकडून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने तिने पुन्हा एकदा २३ नोव्हेंबरला विद्यापीठाला लेखी अर्ज दिला.तेव्हा ही तिकडून काहीच पॉझिटिव्ह प्रतिसाद मिळाला नाही.

७ डिसेंबरला ति विद्यापीठाच्या परीक्षा केंद्रात महेश काकडे, ललित पवार आणि कुलगुरूंचे पीए गोसावी यांना भेटली. काकडे यांनी तिला विद्यापीठाच्या प्रोसेसची वाट बघ असे सांगितले.परंतु तिथेही प्रतिसाद न मिळाल्याने तिने राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते आणि विद्यापीठाचे अध्यक्ष सोमनाथ (भैय्या) लोहारे यांची भेट घेऊन तिची अडचण सांगितली.

सोमनाथ (भैय्या) लोहारे यांनी तिची अडचण ऐकून घेत तिला थेट सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ नितीन करमळकर यांच्याकडे घेऊन गेले. आणि तिची अडचण सांगितली.त्यानंतर लेखी अर्ज घेत डॉ नितीन करमळकर यांनी तिला २ दिवसात तिच्या या बाबतीतला प्रश्न सोडवू असे आश्वासन दिले आहे.आत्ता तिच्या उत्तीर्ण पत्रावर पास हा शिक्का कधी लागणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.