अष्टपैलू रवींद्र जडेजा नसणे, इंग्लंडच्या फायद्याचे आहे :इंग्लडच्या ‘या’ माजी क्रिकेटपटूचे वक्तव्य

6

नव्या वर्षातील भारतीय क्रिकेट संघाची मायदेशातील पहिली कसोटी मालिका ५ फेब्रुवारीपासून इंग्लंड विरुद्ध चेन्नई येथे सुरू होत आहे. बंद दाराआड खेळवली जाणारी ही मालिका कमालीची अटीतटीची होऊ शकते.

इंग्लंडकडून ७१ कसोटी सामने खेळणार्या बूचरने आगामी मालिकेविषयी अनेक मुद्द्यांवर आपली मते मांडली. तो म्हणाला, “भारताविरुद्धची मालिका इंग्लंडसाठी सोपी राहणार नाही. श्रीलंकेतील परिस्थिती आणि येथील परिस्थितीत खूप तफावत आहे. इंग्लंड संघाला जिंकण्यासाठी धैर्याने खेळ करावा लागेल. भारत आणि इंग्लंड हे दोन्ही संघ कोणत्याही एका खेळाडूवर अवलंबून नसतात. त्यामुळे इंग्लंडसाठी वेगळे आव्हान असेल. 

इंग्लंड संघाला नुकत्याच संपलेल्या श्रीलंका दौ-यात डावखुरा फिरकी गोलंदाज लसिथ एमबुलडेनियाने त्रस्त केले होते. या युवा फिरकीपटूने दोन सामन्यात १५ इंग्लिश फलंदाजांना बाद करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

माजी क्रिकेटपटू आणि जाणकार या मालिकेविषयी आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मार्क बूचरनेही आगामी मालिकेविषयी आपली मते मांडली. भारतीय फिरकीपटू सर्वात्तम आहेत तरीही, अष्टपैलू रवींद्र जडेजा नसणे, इंग्लंडच्या फायद्याचे आहे, असे बूचरने म्हटले.

त्यामुळे सर्व क्रिकेट जगताचे लक्ष या मालिकेकडे लागलेले दिसून येते. दोन्ही संघात दर्जेदार खेळाडू असल्याने खेळाडू तसेच प्रेक्षकांमध्ये या मालिकेविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.