भाजपच्या दाव्यानुसार महाविकासआघाडीतील त्या तीसर्‍या मंत्र्याचे नाव ऊघड

15

सचिन वाझे प्रकरण महाविकासआघाडी सरकारला चांगलेच भोवले आहे. अनिल देशमुखांच्या पाठोपाठ राज्य परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणीतसुद्धा आता वाढ झाली आहे. सचिन वाझे यांनी स्वहस्ते लिहीलेल्या पत्रात अनिल परब यांनीसुद्धा वसुली करण्याचे सांगीतले असल्याचे नमुद आहे. यामुळे भाजपच्या दाव्याप्रमाणे महाविकासआघाडी सरकारमधील आणखी एक मंत्री अडचणींत आले आहेत.

माजि पोलिस अधिकारी संचिन वाझे यांचे स्वहस्ते लिहीलेले एक पत्र व्हायरल होते आहे. यामध्ये संपूर्ण घटनाक्रम नमुद केला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नावसाोबतच मुंबईनपातील चुकीच्या पद्धतीने काम करणार्‍या ५० कंत्राटदारांकडून त्यांनी वसुलीचे अदेश दिले होते असे लिहीले आहे.

हे पत्र बाहेर आल्यानंतर अनिल परब यांच्या अडचणीत वाड झाली आहे. भाजपकडून त्यांच्यावर चौफेर टीका केली जात असून राजिनाम्याची मागणी केली जात आहे. अनिल परब यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहे.

महाविकासआघाडी सरकारच्या मंत्रीमंडळाएवढे खालच्या दर्जाचे मंत्रीमंडळ याअगोदर या देशाने कधीच बघीतले नाही. गुन्हेगारीचे कुठलेच क्षेत्र महाविकासआघाडी सरकारमधील मंत्र्यांनी सोडले नाही. जनतेचे भले करण्याएवजी वसुली करणार्‍या सरकारकडून जनतेने काय अपेक्षा करावी असे भाजपने म्हटले अाहे.