महाविकास आघाडीचे सरकार तीन पक्षांचे आहे. त्यामुळे तिन्ही पक्षाचे प्रमुख यासंबंधी निर्णय घेतील” असे संजय राऊत यांनी सांगितले.मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेरील स्फोटक प्रकरणात सचिन वाझेंना अटक झाल्यामुळे सरकारच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे.
हा संपूर्ण विषय गृहखातं आणि पोलीस दलाशी संबंधित असल्यामुळे राज्याचे गृहमंत्री किंवा पोलिस आयुक्तांची बदली होईल अशी चर्चा मागच्या काही दिवसांपासून सुरु आहे. त्यासंबंधी आज संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “खातेबदल हा मुख्यमंत्र्यांच्या अख्त्यारीतील विषय असल्याचे सांगितले.
शरजील इमामवर तो सुटला पाहिजे, अशी कलम लावली जात असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून होतोय, या आरोपावर संजय राऊत म्हणाले की, “शरजील इमामवर कोणती कलम लावावी यासाठी देवेंद्र फडणवीसांनी मार्गदर्शन करावं, ते स्वत: उत्तम वकिल आहेत” असे संजय राऊत म्हणाले.
महाराष्ट्रासारखच पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये हेच सुरु आहे. त्याला फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही” असे राऊत यांनी सांगितलं.
विरोधी पक्ष गौप्यस्फोट, धमाके करणार असेल, तर करुं दे, त्यांचाही वेळ जाईल. फक्त सध्या महाराष्ट्रात आणि देशभरात फटाक्यांवर बंदी आहे, हे त्यांनी लक्षात घ्यावं” असे राऊत म्हणाले.