परभणी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते, लोकसभा निवडणुकीतील उमेदवार राजेश विटेकर यांनी महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप समाजसेविका, भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी केला आहे.
राजेश विटेकरांवर तातडीने बलात्काराचा गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी तृप्ती देसाई यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेवेळी त्यांच्यासोबत पिडीत महिला उपस्थित होती.
दरम्यान, तृप्ती देसाई यांचे आरोप राजेश विटेकर यांनी फेटाळले आहेत. फक्त ब्लॅकमेल करण्यासाठीच आपल्यावर आरोप केला जात असल्याचा, आपली राजकीय कारकीर्दीला ग्रहण लावण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर यांनी माध्यमांशी बोलतांना केला.
सदरील प्रकरणातील अनेक पुरावे आपल्याकडे आहेत. आपल्याला विनाकारण या प्रकरणात गोवले जात आहे, असे विटेकर यांनी स्पष्ट केले आहे. यासंदर्भात आपण गंगाखेडच्या न्यायालयात याचिका दाखल केली आहे. कोणत्याही पद्धतीने माझ्यावर कोणी आरोप करु शकत नाही, असेही ते म्हणाले. वकिलांशी बोलून भुमिका मांडणार असल्याचं ते म्हणाले.