अमरावतीतील मेळघाट येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हान यांच्या आत्महत्येने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला होता. आता याप्रकरणी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. दिपाली चव्हान या गर्भवती होत्या आणि त्यांच्या गर्भपातास त्यांचाच वरीष्ठ अधिकारी असणारे आणि याप्रकरणातील आरोपी डीसीएफ विनोद शिवकुनारच जवाबदार असल्याचे समोर आले आहे.
दिपाली चव्हान यांच्या आत्महत्येप्रकरणी विनोद शिवकुमार यांना अटक करण्यात आली असून याप्रकरणी तोास सुरु आहे. तपासादरम्यान अनेक खुलासे होत आहे. यामध्येच दिपाली चव्हान या गर्भवती होत्या हे माहिती असतांनासुद्धा त्यांना जाणिवपुर्वक पायदळ चालवण्यात यायचे, शिवाय शिवकुमार त्यांना नेहमिच मानसिक त्राससुद्धा देत होते.
पोलिसांनी याप्रकरणी काही मेडीकल रेकॉर्ड आणि काहीजणांचे जवाब घेतले आहे. त्यामध्ये या सर्व बाबी समोर आल्या आहेत. दिपाली चव्हान यांनी आपल्या सुसाईड नोटमध्येसुद्धा तसा ऊल्लेख केलेला आहे.
गर्भवती असल्याचे माहिती असतांनासुद्धा शिवकुमार यांचेकडून दिपाली चव्हान यांना जाणिवपुर्वक मानसिक व शारीरीक त्रास देण्यात येत होता. आणि त्यामुळेच त्यांचा गर्भपात झाला आहे. दरम्यान धारणी पोलिसांनी शिवकुमार यांचेवर अधिक गुन्हे दाखल केले आहेत.