काय आहे नेमकं प्रकरण
अन्वय नाईक आत्महत्या आणि टीआरपी घोटाळा हे दोन प्रकरण अर्णव गोस्वामींना चांगलेच बेतले आहेत. यावरच अन्वय नाईक प्रकरणांत त्यांना कोर्टाने दिलासा दिला असला तरी टीआरपी घोटाळा प्रकरण अद्याप न्यायालयात आहे. अन्वय नाईक हत्याप्रकरणी अर्णव गोस्वामींना अटकसुद्धा करण्यात आली होती. या अटकेदरम्यानच कारागृह अधिक्षकांनी अर्णवला कारागृहात मदत केली असल्याचे समोर आले आहे आणि त्यावरुनच कारागृह अधिक्षक अंबादास पाटील यांच्यावर नीलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
अर्णव गोस्वामी यांस तुरुंगात कुणीतरी मोबाईल पोहचवल्याचे प्रकरण समोर आले होते. त्यानंतर प्रकरणाची खातेनिहाय चौकशी करण्यात आली आणि यातून काही बाबी ऊघड झाल्या आहेत. कारागृह अधिक्षक अंबादास पाटील यांनीच अर्णवपर्यंत मोबाईल पोहचण्यासाठी मदत केल्याचे उघड झाले आहे. सोबतच अर्णव यांस कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंटसुद्धा देण्यात आली होती. अंबादास पाटील यांचे नाव पुढे अाल्यानंतर त्यांच्यावर नीलंबनाची कारवाई करण्यात आली. याअगोदरसुद्धा दोन तुरुंग कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. तुरुंग महानिरीक्षक यांनी ही कारवाई केली आहे.
६ नोव्हेंबर रोजी अर्णवला कारागृहात मोबाईल पुरवला असल्याची घटना पुढे आली होती. यानंतर अर्णवला मोबाइल पुरवण्यात तुरुंग पोलिस सुभेदार अनंत डेरे व सचिन वाडे यांचा हात आहे. असे करागृह अधीक्षक अंबादास पाटील यांनी य्यावेळी सांगत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती.
मात्र त्यानंतर या दोन्ही कर्मचाऱ्यांनी जिल्हा कारागृह अधीक्षक पाटील यांनीच मोबाइल आणि इतर सुविधा पुरवल्याचा आरोप केला होता. यानंतर खातेनिहाय चौकशी करण्यात आली आणि त्यातूनच अंबादास पाटील यांचे नाव पुढे आले आहे.