कोरोना महामारीच्या अभुतपूर्व संकटातून जनतेला बाहेर काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वतःला झोकून द्यावे, असे आवाहन शरद पवार साहेब यांनी केले होते.
या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तातडीने जिल्हा, तालुका पातळीवर रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे, असे आवाहन केले होते. तसे पत्र संबंधित जिल्ह्यातील नेत्यांना कार्यकर्त्यांना पाठवण्यात आले होते.
जयंत पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- कुलाबा तालुका येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. कुलाबा तालुका जिल्हाध्यक्ष विजय वाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आयोजन करण्यात आलं.
तालुकाध्यक्ष मनोज अमरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या शिबिराला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी आमदार अनिल गोटे देखील उपस्थित होते.