खूप वर्षांपासून डिप्रेशनमध्ये असलेली अमिर खानची मुलगी इरा खान सोशल मीडियावर नेहमी एक्टिव्ह असते. तिने आपल्या डिप्रेशनचा अनुभव व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांशी शेअर केला होता. सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडीओमुळे ती सतत चर्चेत असते. नुकतेच फिटनेस ट्रेनर नुपुर शिखरेसोबतचे फोटो पोस्ट करत इराने रिलेशनशिपमध्ये असल्याचं जाहीर केले आहे. व्हॅलेंटाइन वीकमधील ‘प्रॉमिस डे’चं निमित्त साधत इराने तिच्या प्रेमाची कबुली दिली आहे.
सोशल मीडियावर नुपूरसोबतचे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. व्हॅलेंटाईन वीकमध्ये इराने सोशल मीडिया पोस्ट शेअर करत रिलेशनशीप जवळजवळ कन्फर्म केले आहे. ‘तुझ्यासोबत आणि तुला वचनं देणं हे माझं सौभाग्य आहे’, असं म्हणत इराने नुपुरसोबतचे रोमँटिक फोटो पोस्ट केले आहेत. या कॅप्शनच्या हॅशटॅगमध्ये इराने #myvalentine असा उल्लेख केला आहे. तिच्या या फोटोंवर नेटकरी व सेलिब्रिटींकडून लाइक्स व शुभेच्छांचा वर्षाव होतोय.
लॉकडाउनदरम्यान इरा आणि नुपूर यांच्यातल्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. आता हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याचे समजते. महाबळेश्वर इथल्या आमिर खानच्या फार्महाऊसमध्ये दोघांनी सुट्ट्यांचा आनंद घेतला. इराने नुपूरची ओळख आई रिना दत्ता यांच्याशी करून दिली. इतकच नव्हे तर तिघांनी जवळच्या मित्रमैत्रिणींसोबत मिळून दिवाळी एकत्र साजरी केली होती.