अभिनेता रजनीकांत गेल्या दोन वर्षांपासून राजकारणात सक्रिय असल्याचे पाहायला मिळत होत. परंतु आत्तापर्यंत त्यांनी राजकारणात प्रवेश केला नव्हता. त्यांनी लोकसभा निवडणुकीत सहभाग घेतला नव्हता. मात्र यावेळी ते ३१ डिसेंबरच्या मुहूर्तावर राजकारणात प्रवेश करत आपल्या नव्या पक्षाची घोषणा करणार आहेत. तर नवीन वर्षात म्हणजेच जानेवारीत नवीन पक्षाचं लॉनचिंग केलं जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
गेल्या वर्षी अभिनेता कमल हसन आणि रजनीकांत यांनी एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर हे दोघेही एकत्र येऊन राजकारणाची इनिंग खेळणार असल्याच्या चर्चानि तमिळनाडूच्या राजकारणात खळबळ माजली होती. २०१७ साली रजनीकांत यांनी डिसेंबरमध्ये नवीन पक्षाची स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्यावेळी त्यांच्या राजकीय एंट्रीबाबत चर्चा रंगल्यावर ट्विटरवर #rajnikantpoliticalentry हा हॅशटॅग ट्रेंड झाला होता.
तामिळनाडू मधील गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यानंतर तेथील राजकीय पक्ष निवडणुकांच्या दृष्टीने सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. २०२१ मध्ये तामिळनाडू विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांमध्ये रजनीकांत आणि त्याच्या संघटनांची भूमिका काय असणार. याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. थलैवा म्हणजेच रजनीकांत निवडणूक लढवणार का? राजकीय जीवनात उतरणार का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत.