बॉलीवूडचा दिग्गज अभिनेता अक्षय कुमारचा बहुचर्चित सिनेमा ‘लक्ष्मी’ हा चित्रपट 9 नोव्हेंम्बरला डीस्ने हॉटस्टार वर रिलीज झाला होता. यामध्ये अक्षय सोबत कियारा अडवाणी देखील मुख्य भूमिकेत आहे. अक्षय कुमारचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात असून त्याच्याकडून कामाची अपेक्षा जास्त होती. मात्र, हा चित्रपट रिलीज होताच अजून एका अभिनेत्याचं नाव समोर आलं आहे. या अभिनेत्याची सोशल मिडियावर सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. हा अभिनेता आहे शरद केळकर. शरद केळकरने या सिनेमात खऱ्या लक्ष्मीची भुमिका साकारली आहे.
अभिनेता शरद केळकर यांनी आपल्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. काही लोकांना चित्रपट पाहून वेळ घालवल्यासारखे वाटले आहे. या सिनेमाला रेटिंगदेखील 10 पैकी 2.6 मिळाली आहे. कंचना या तामिळ चित्रपटाचा हा रिमेक आहे. चाहते या चित्रपटावर नाराज आहेत परंतु, लक्ष्मीची भूमिका साकारणार शरद केळकर मात्र हिट ठरताना दिसला आहे. याबाबत शरद केळकरचे जोरदार ट्विट होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे शरद केळकरच रोल केवळ 15 ते 20 मिनिटांचा आहे. अक्षयच्या अभिनयाला चाहत्यांनी पसंदी दर्शवली नाही. परंतु शरद केळकरच्या अभिनयाचं मात्र खूप कौतुक होत आहे.