सध्या संपूर्ण देशभरात शेतकरी आंदोलनाबाबत जोरदार वातावरण पेटले आहे. शेतकरी त्यांच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी खूप दिवसांपासून आंदोलन करत रस्त्यावर आले आहेत. शेतक-यांच्या या आंदोलनाबद्दल अनेकांनी मत व्यक्त केली आहेत. अभिनेत्री कंगना रनौत या आंदोलनाच्या विरोधात बोलताना दिसत आहे तर दुसरीकडे मिका सिंह, दिलजीत दोसांज, हिमांशी खुराना यांसारखे सेलिब्रिटी या शेतक-यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत त्यांच्या पाठिशी उभे आहेत.
बॉलीवूड प्रसिद्ध अभिनेता सोनू सूनने देखील शेतक-यांना समर्थन करत प्रतिक्रिया देत ट्विट केलं आहे. शेतक-यांचं महत्व सांगत त्याने ट्विटमध्ये शेतक-यांना संपूर्ण हिंदुस्तानाची उपमा दिली आहे. सोनू सूद यांनी ट्विटमध्ये ”किसान है हिंदुस्तान” असे लिहले आहे त्याच्या पोस्टवर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येताना दिसत असतात ते नेहमी स्पष्टपणे मत व्यक्त करत असतात. त्यांचे चाहते त्यांच्या मताचा नेहमी आदर करतात.
सोनु सूद यांच्या ट्विटवर कंगना रनौतने कमेंट केली आहे. यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कंगनाने काही दिवसांपूर्वी एका ट्विटमध्ये म्हटलं होतं की वृद्ध महिला शेतक-यांच्या या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या आणि नंतर त्यांनी म्हटलं की १०० रुपयांसाठी आम्ही कुठेही जाऊ शकतो. तिच्या या ट्विटनंतर सोशल मिडियावर ती खूप ट्रोल झाली होती. आता सोनू सूदच्या ट्विटवर कमेंट केल्यामुळे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकणार आहे.