अभिनेता सनी देओलला कोरोनाची लागण

9

बॉलीवूड अभिनेता आणि पंजाब गुरुदासपूरचे खासदार सनी देओल यांना कोरोनाची लागण झाली आहे. हिमाचल प्रदेशचे आरोग्य सचिव यांच्याकडून ही माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सनी गेले काही दिवस हिमाचल मधील मनाली येथे फार्म हाऊस वर राहत आहे. मंगळवारी सनी देओल यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मुंबईत परत येण्यासाठी चाचणी केली गेली ती पॉझिटिव्ह आली आहे.

64 वर्षीय या अभिनेत्याच्या खांद्याला दुखापत झाली होती आणि त्यामुळे खांद्यावर शस्त्रक्रिया केली गेली होती. या कारणाने विश्रांतीसाठी सनी मनाली येथे गेला होता. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. परंतु आता त्यांची तब्येत ठीक असल्याचे समजत आहे. सनी सुट्टीसाठी मनाली येथे जातो, मनाली त्याचे आवडते पर्यटन स्थळ आहे तो नेहमी तेथील फोटो शेअर करत असतो.