अभिनेता टायगर श्रॉफ आणि दिशा पाटणीवर गुन्हा दाखल; लॉकडाऊन मध्ये फिरत होते

11

कोरोना संकटाने देशाला अडचणीत आणले आहे. तर दुसरीकडे अजूनही लोक नियम पाळायला तयार नसल्याचं पाहायला मिळतंय. बॉलीवुड अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पाटणी यांच्यावर अनावश्यक गोष्टीसाठी बाहेर पडल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोणत्याही वैध कारणाशिवाय सार्वजनिक ठिकाणी फिरून साथीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांविरुद्ध भारतीय दंड विधानसभा कलम 188, 34 IPC नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिनेता टायगर श्रॉफ, अभिनेत्री दिशा पाटणी आणि त्यांचा ड्रायव्हर या तिघांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. टायगर श्रॉफ आणि दिशा पाटणी हे वांद्र्यात जिमनंतर ड्राईव्हसाठी गेले होते.

त्याचवेळी वांद्र्यातील बँडस्टँड पोलिसांनी दोघांना ड्रायव्हर सोबत अडवले. त्यानंतर पोलिसांनी त्याचे आधार कार्ड, लायसन्स आणि इतर कागदपत्रांची तपासणी केली. यानंतर त्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.