2020 मध्ये अनेक सेलिब्रिटींची लग्न होत आहेत. तसेच या नव्या वर्षात देखील अनेक सेलेब्रिटी लग्नबंधनात अडकणार आहेत. तर या वर्षात सोनाली कुलकर्णी, मानसी नाईक, अभिज्ञा भावे, सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकर हे कलाकार लग्नबेडीत अडकणार आहे. नव्या वर्षात सर्वात प्रथम लग्नाचा नंबर आहे अभिज्ञा भावेचा. अभिज्ञा लवकरच मेहूल पैसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. नुकताच तिचा मेहंदी सेरेमनीचा व्हिडीओ समोर आला आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
अभिज्ञा भावेचा मेहंदी सेरेमनीचा व्हिडीओ सोशल मीडियावर पहायला मिळतो आहे. या व्हिडीओत अभिज्ञाने पिवळ्या रंगाचा टॉप आणि गुलाबी रंगाचा लेहंगा घातलेला दिसतो आहे. या व्हिडीओमध्ये अभिज्ञाने फुलांचे दागिने घातलेले दिसत आहेत. या वेशात ती अतिशय सुंदर दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तिच्या हातापयावर मेहंदी लागताना दिसत आहे. या फोटोंवर आणि व्हिडिओवर चाहत्यांनी शुभेच्छा देत कमेंटचा वर्षाव केला आहे.
अभिज्ञाच्या होणारा नवरा मेहुल पै मुळचा मुंबईचा असून गेल्या १२ वर्षांपासून ‘क्लॉकवर्क्स इव्हेंटस प्रायव्हेट लिमिटेड’मध्ये तो ऑपरेशन्स मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. यातून इव्हेंट मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंट, फायनान्शियल प्लॅनिंगची जबाबदारी तो सांभाळतो आहे. २०१४ साली ती वरूण वैटिकर यांच्यासोबत विवाहबद्ध झाली होती. मात्र काही कारणास्तव नंतर ती विभक्त झाली. लवकरचं ती पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकणार आहे.