अभिनेत्री धनश्री काडगावकर घरी झाले नव्या पाहुण्याचे आगमन

17

‘तुझ्यात जीव रंगला’ फेम वहिनीसाहेब म्हणजेच डॅशिंग अभिनेत्री धनश्री काडगावकर हिने चाहत्यांना एक गुडन्युज दिली आहे. वहिनीसाहेब आता आईसाहेब झाल्या आहेत. तिच्या घरी चिमुकल्याचे आगमन झाले आहे. धनश्रीने गुरुवारी सकाळी गोंडस मुलाला जन्म दिला आहे.

आई झाल्याची बातमी धनश्रीने स्वत: तिच्या सोशल मिडियावरुन दिली आहे. तिचे बाळ आणि ती सुखरुप असल्याचे तिने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. धनश्रीने दिलेल्या गोड बातमीने तिच्या चाहत्यांनी तिला अनेक शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर अनेक सेलिब्रेटींनीही धनश्री आणि तिच्या बाळाला शुभेच्छा आणि आशिर्वाद दिले आहेत.

ही बातमी सांगताना मला खूप आनंद होत आहे. सर्वांच्या आशिर्वादाने मी आणि माझे बाळ आम्ही दोघेही सुखरुप आहोत. तुमच्या सर्वांचे आशिर्वाद आणि शुभेच्छा अशाच कायम राहो’, असे धनश्रीने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
धनश्री आणि तिचा नवरा दुर्वेश अखेर आई बाबा झाले आहेत. धनश्रीने तिच्या नवऱ्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तिच्या चाहत्यांना तिच्या प्रेग्नंसीची गोड बातमी दिली होती. तिच्या प्रेग्नंसीपासून धनश्री चांगलीच चर्चेत आली होती.