सुशांतसिंग राजपुत आत्महत्या प्रकरणात ड्रग्स कनेक्शन समोर आल्यानंतर त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिला अटक करण्यात आली होती. बॉलिवूडमधील बऱ्याच सेलेब्रिटिंची चौकशी करण्यात आली होती. अजूनही या प्रकरणाचा तपास सुरु आहे. एनसीबी टीमचे सुरू असलेले तपासकार्य आर आर एस म्हणजे इंडियन रेव्हन्यु सर्विसेसचे ऑफिसर समीर वानखेडे करत आहेत.
दरम्यान समीर वानखेडे आणि त्यांच्या टिमवर गोरेगाव मध्ये ड्रग्स पॅडलरने हल्ला चढविला होता. 50 ते 60 जणांच्या घोळक्याने एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर हल्ला केलेला होता. यामध्ये समीर वानखेडे आणि त्यांचे दोन अधिकारी जखमी झाले होते. अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी इन्स्टाग्राम पोस्ट करून समीर यांच्या तब्येतीची माहिती दिली आहे. तिने या पोस्ट मध्ये लिहले आहे की, समीर आता ठीक आहेत. आम्ही त्यांच्यासोबत घरी आहोत. नार्कोटिक्स टीमला मोठा सॅल्युट जे ड्रग्स कनेक्शनच्या विरोधात उभे राहिले आहेत. आम्हाला तुमच्यावर खूप गर्व आहे. 29 मार्च 2017 मध्ये क्रांती आणि समीरचे लग्न झाले आहे. त्यांना जुळ्या मुली आहेत.
2013 मध्ये सिंगर मिका सिंग यांना मुंबई एअरपोर्टवर कस्टम अधिकाऱ्यांनी परकीय चलनासोबत पकडले तेव्हा समीर वानखेडेंनी त्यांच्यावर कारवाई केली होती. समीर 2004 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांची पहिली पोस्टिंग मुंबई एअरपोर्टवर कस्टम अधिकारी म्हणून झाली होती. ते आंध्र प्रदेश आणि दिल्लीमध्येही सेवेत होते. समीर यांच्या नेतृत्वाखाली दोन वर्षात सुमारे 17 हजार कोटींचे ड्रग्स पकडले आहेत. त्यांनी अनुराग कश्यप, विवेक ओबेरॉय, रामगोपाल वर्मासह बॉलीवूडच्या अनेकांच्या घरी छापेमारी केली आहे.

