अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

10

विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्ती जागेसाठी शिवसेनेच्या कोट्यातून उर्मिला मातोंडकर यांचे नाव महाविकास आघाडी सरकारने पाठवलं होत. बॉलिवूड मराठमोळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी अखेर आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी हातावर शिवबंधन बांधत नव्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली आहे.

उर्मिला मातोंडकर यांनी गेल्या वर्षी काँग्रेस पक्ष्याच्या वतीने उत्तर मुंबई मतदार संघातून निवडणूक लढवली होती. त्यांचा तेव्हा पराभव झाला होता. त्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षाच्या भोंगळ कारभारावर बोट ठेवत पक्षाला राजीनामा दिला होता. काँग्रेसच्या राजीनाम्यानंतर त्या राजकारणापासून लांब होत्या. उर्मिला मातोंडकर मंगळवारी शिवसेनेत प्रवेश करतील अशी माहिती शेवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना दिली होती.

आज दुपारी उर्मिला मातोंडकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी मातोंश्रीवर पाहोचल्या आहेत. राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या जागेसाठी शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्यांची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. त्याआधी उर्मिला मातोंडकर यांनी शेवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सौ.रश्मीताई ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शेवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.