अदर पुनावालांना शिवसेनेच्या गुंडांनी धमकी दिली, इंडिया टुडेच्या वक्तव्यावर मंत्री देसाई यांनी घेतला आक्षेप !

149


संपूर्ण जगभरात कोरोना रोखण्यासाठी लस बनवणारी अव्वल कंपनी असलेली सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रमुख अदर पूनावाला यांना लसींसाठी मोठ्या प्रमाणात फोन येत असून काही जणांकडून धमक्याही दिल्या जात असल्याची माहिती पुनावाला यांनी दिली होती. मला येणारे फोन कॉल्स अत्यंत वाईट बाब आहे. फोन करणाऱ्यांमध्ये प्रतिष्ठित लोकांचा समावेश देखील आहे,


मात्र यावर आता ‘इंडिया टुडेच्या वरिष्ठ पत्रकाराने धक्कदायक विधान केले आहे. शिवसेनेतील काही गुंडांनी सिरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) अदर पुनावाला यांना धमकावले. त्यामुळे अदर पुनावाला परदेशात निघून गेले, असे वक्तव्य ‘इंडिया टुडे’ वृत्तवाहिनीचे सूत्रसंचालक राहुल कनवाल यांनी केले आहे. या विधानावरून आता शिवसेनेने इंडिया टुडेला चांगलेच फैलावर घेतले आहे.


या केलेल्या आरोपांवर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी यासंदर्भात इंडिया टुडे समूहाला पत्र पाठवून राहुल कनवाल यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या पत्रात सुभाष देसाई यांनी लिहिले आहे की, राहुल कनवाल यांनी तुमच्या वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान अदर पुनावाला यांना शिवसेनेच्या गुंडांनी लसीसाठी धमकावल्याचे म्हटले. ही गोष्ट धादांत खोटी आणि बदनामीकारक आहे. शिवसेनेची प्रतिमा मलीन करण्याच्या कटाचा हा भाग वाटतो. कदाचित या माध्यमातून सध्या देशभरात सुरु असलेले कोरोनाचे थैमान आणि विधानसभा निवडणुकीच्या निकाल या विषयांवरील लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.आमचा ‘इंडिया टुडे’ समूहाच्या पत्रकारितेवर विश्वास आहे. त्यामुळे राहुल कनवाल यांनी याबद्दल जाहीर माफी मागावी, अशी मागणी सुभाष देसाई यांनी पत्रात केली आहे.

puna