कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह असेल तरच दिल्लीत प्रवेश : केजरीवाल सरकराचा निर्णय

9

महाराष्ट्रासह केरळ, मध्यप्रदेश, छत्तीसगड, पंजाब या राज्यातून येणाऱ्या रुग्णांची कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह असेल तरच दिल्लीत प्रवेश देण्याचा निर्णय केजरीवाल सरकराने घेतला आहे. महाराष्ट्रासह, केरळ, मध्यप्रदेश व इतर राज्यांमध्ये कोरोना प्रसार वेगाने पसरत आहे.

त्यामुळे दिल्लीत प्रवेश करताना कोरोना निगेटिव्ह RT-PCR दाखवणे गरजेचे असणार आहेत. २६ फेब्रुवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार असून, १५ मार्चपर्यंत हे लागू असणार आहे.

दिल्लीत जाण्यासाठी ७२ तासांपूर्वीची कोरोना टेस्ट निगेटिव्ह असल्यानंतरच प्रवास करु शकतात. हा निर्णय रेल्वे, बस, विमान या सर्व वाहतूक प्रवासासाठी लागू असणार आहे.

महाराष्ट्रासह, केरळ, मध्यप्रदेश व इतर राज्यांमध्ये कोरोना प्रसार वेगाने पसरत आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये परिस्थिती पुन्हा चिंताजनक बनत आहे. यामुळे दिल्ली सरकारने खबरदारीचा निर्णय घेतला आहे.