महाराष्ट्र वक्तृत्व परिषदेच्या औरंगाबाद जिल्हाध्यक्षपदी ॲड आकाश बागल

4

महाराष्ट्र वक्तृत्व परिषदेच्या औरंगाबाद जिल्हाध्यक्षपदी ॲड आकाश बागल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र वक्तृत्व परिषदेचे अध्यक्ष शिवराज आनंदकर यांनी नियुक्तीपत्र देऊन त्यांची नियुक्ती केली आहे. वक्तृत्व विकास, प्रसार, आणि सामाजिक, शैक्षणिक, शासकीय योजना राबवण्यासाठी वक्तृत्व परिषदेने ही निवड केली असल्याचं नियुक्ती पत्रात म्हटले आहे. वक्तृत्व परिषदेची ध्येय धोरणे राबवण्यासाठी ही नियुक्ती केली आहे.

आकाश बागल हे कवी, लेखक, तसेच समजप्रबोधनकार आहेत. वक्तृत्व परिषदेच्या औरंगाबाद जिल्हाध्यक्ष पदी आकाश बागल यांनी निवड सार्थ असल्याची भावना वक्तृत्व जाणकारांमध्ये आहे. आकाश बागल यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. येणाऱ्या काळात वक्तृत्व विकासासाठी ते प्रामाणिक प्रयत्न करणार आहेत.