राष्ट्रावादी कॉंग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजिनामा दिल्यानंतर, गृहमंत्रीपदी कुणाची वर्णी लागणार याकडे सगळ्याचे लक्ष होते. राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांच्या नावावर गृहमंत्रीपदी शिक्कामोर्यब करण्यात आला. आजा त्यांनी गृहमंत्रीपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर महत्वाची विधानं केली आहेत. ते पत्रकारांशी बोलत होते.
येणार्या काळात पोलिस अधिकार्यांच्या निष्ठा कुठल्या राजकीय पक्षाशी आहे हे तपासून पाहिले जाणार आहे असा सुचक ईशारा त्यांनी यावेळी दिला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निष्ठा असणारे पोलिस कर्मचारी पोलिस दलात आहेत, आणि ते आपली निष्ठा पार पाडतायत? पत्रकाराने केलेल्या या प्रश्नावर ऊत्तर देतांना ते बोलत होते.
मुंबई ऊच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयास सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचेसुद्धा त्यांनी यावेळी सांगीतले. तसेच माझ्यावर सोपवण्यात आलेली जवाबदारी मी ऊत्तमरित्या पार पाडण्याचा प्रयत्न करेन असेसुद्धा ते यावेळी म्हणाले.
१ लाख पोलिस कर्माचार्यांना घरे, पोलिसभरती आणि शक्ती कायदा यावर विशेष भर दिला जाणार आहे. नविन वसुली मंत्री कोण असणार? या भाजपच्या टीकेस प्रत्युत्तर देतांना कुणी काहीही टीकाटीपण्णी करु देत महाराष्ट्राला पारदर्शक कारभार देण्याचा माझा प्रयत्न असेल असेसुद्धा ते यावेळी म्हणाले.