तामिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार आणि रजनीकांत यांचा जावई धनुष याचे नवीन गाणे सध्या लोकप्रिय झाले आहे. धनुष हा साऊथ सिनेसृष्टीतील एक नामवंत अभिनेता आहे. तो नेहमी अभिनयामुळे चर्चेत असतो यावेळी तो त्याच्या नवीन गाण्यामुळे प्रचंड चर्चेत आला आहे. त्याच्या मारी टु या चित्रपटातील ‘राऊडि बेबी’ या गाण्याला 1 कोटी पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. हा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात धनुष आणि कृष्णा मुख्य भूमिकेत आहेत. राउडी बेबी हे गाणे धनुष आणि धी यांनी गायले होते.
यामुळे आनंदित होऊन भावना व्यक्त करत धनुषने ट्विट केले आहे. ‘काय गोड योगायोग आहे, ज्या दिवशी राउडी बेबीने 100 कोटी व्ह्यूज पूर्ण केले त्याच दिवशी कोलावरी डी गाण्याला 9 वर्ष पूर्ण झाली आहेत. राउडी बेबी गाण्याने ‘वाय धिस कोलावरी डी’ या गाण्याचा विक्रम मोडला आहे. धनुषचे हे दुसरे गाणे प्रचंड गाजले आहे. धनुषचे ट्विट सध्या सोशल मिडियावर प्रचंड गाजत आहे. दरम्यान धनुषची को स्टार साई पल्लवीनेही ट्विट करत लिहले आहे की, “राउडी बेबी आपलेसे केल्याबद्दल धन्यवाद! वन मिलियन लव्ह एंड काउंटिंग”