अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी अनेक लोक आर्थिक मदत करत असल्याचं पाहायला मिळतंय. शिवसेने राम मंदिर निर्मितीसाठी तब्बल 1 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. मंदिराच्या बांधकामासाठी अनेकजण आर्थिक मदत करत आहेत.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी काल राम मंदिर निर्माण करण्यासाठी 1 लाख 11 हजार रुपयांचा निधी चेकद्वारे दिला आहे. नागपुरात कालपासून निधी संकलनाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. यावेळी बोलताना राज्यपाल यांनी माहिती दिली आहे.
वर्षानुवर्षे चाललेल्या वादानंतर राम मंदिर निर्माण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच अयोध्येत रामाचे भव्य मंदिर उभारण्यात येत आहे. सूरतच्या एका व्यापाऱ्यानेही तब्बल 11 कोटी रुपये राम मंदिरासाठी दिले आहेत.
खूप मोठ्या संघर्षानंतर राम मंदिर बनवत आहोत. आपल्याला देशात राम राज्य आणायचे आहे. देश एका योग्य दिशेत चालला आहे. प्रत्येक घरात जाऊन योगदान घ्यायचे आहे. भव्य दिव्य राम मंदिर तयार होणार. यात सगळ्यांचा सहभाग असणे गरजेचे असल्याचं भगतसिंग कोश्यारी यांनी म्हटलं आहे.