“सुशांत राजपुतच्या आत्महत्येनंतर राण पेटवणार्‍यांना खा. डेलकरांबद्दल काही कसे वाटत नाही” काय म्हणाले संजय राऊत

4

दादरा व नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातील खा. मोहन डेलकर यांनी मुंबईत येऊन आत्महत्या केली. शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी या आत्महत्येवर संशय व्यक्त करत सुशांत राजपुतच्या आत्महत्येनंतर सीबीआय चौकशीची मागणी करणार्‍या भाजप नेत्यांवर टीका केली आहे. दै. सामनामधील रोखठोक या सदरातून त्यांनी मोहन डेलकर यांच्या आत्महत्येबाबत अनेक शंका ऊपस्थित केल्या आहेत. तसेच त्यांच्या आत्महत्येमागील कारणाचा मागोसा घेण्याचा प्रयत्नसुद्धा त्यांनी या लेखातून केला आहे.

खा. मोहन डेलकर हे निर्भीड नेता होते. ते तब्बल सातवेळा खासदार म्हणून निवडुन आले आहेत. दादरा नगर हवेली सारख्या केंद्रशासित प्रदेशातील दिल्लीचे पाय चेपणारे प्रशासकीय अधिकारी नेहमिच स्थानिक लोकप्रतिनिधींच्या कार्यमाध्ये अडथळा निर्माण करत असतात. अशी व्यथा ते वारंवार बोलून दाखवत. त्यांच्या आत्महत्येनंतर आढळलेल्या सुसाईन नोटमध्येसुद्धा त्यांनी याचा ऊल्लेख केला आहे. डेलकर यांच्याशी माझे वैयक्तिक संबंद्ध होते. आत्महत्या करण्याएवढे घाबरट ते नक्कीच नव्हते. तरिसुद्धा त्यांनी आत्महत्या केली हे मान्य केले. मात्र त्यांना आत्महत्या करण्यास कुणी भाग पाडले का? हा प्रश्न अनुत्तरीर राहतो. तसेच त्यांचे गुजरातमध्येसुद्धा घर असतांना त्य‍‍ांनी मुंबई येथे येऊन सुसाईड नोट लिहून आत्महत्या का केली? हासुद्धा प्रश्न आहे. असे अनेक सवाल संजय राऊत यांनी ऊपस्थित केले आहे.

तसेच सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येप्रकणी आटापीटा करणारे, मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर संशय घेणार्‍यांना खा. डेलकर यांच्या आत्महत्येबद्दल काहीच कसे वाटत नाही. एका अभिनेत्याच्या आत्महत्येनंतर बडबड करणारे लोकप्रतिनिधीच्या आत्महत्येनंतर शांत का बसलेत? असे अनेकानेक सवाल करत त्यांनी भाजपवर अप्रत्यक्षरित्या टीकासुद्धा केली आहे. डेलकर हे दिल्लीत मुजरा करणार्‍या प्रशासनाचेच बळी ठरले असा दावासुद्धा त्यांनी केला आहे.

लोकसभा अध्यक्षांनी तरी सातवेळा लोकांनी निवडुन दिले असलेल्या खा. मोहन डेलजर यांच्याबद्दल सहानूभुती दाखवावी. दोन मिनिटांची श्रद्धांजली वाहण्यासोबतच सखोल चौकशीचेसुद्धा आदेश द्यावेत. अशी मागणीसुद्धा संजय राउत यांनी याबसदरात केली आहे.