अखेर प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर प्रहारचे ते उपोषण मागे!

31

वाशिम प्रतिनिधी – अजिंक्य जवळेकर

कारंजा तालुक्यातील शेतकर्‍यांचा खरीप हंगामात पिकांचे नुकसान होऊनही त्यांना पिकविमा मिळेलेला नाही. याप्रकरणी वारंवार तक्रारी करुनसुद्धा प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने प्रशासकीय कुचकामी धोरणाचा निषेध नोंदवत आमरण ऊपोषण करण्यात आले होते. दोन दोवसांनंतर अखेर प्रशासनाच्या हस्तक्षेपामुळे प्रहारच्या कार्यकर्त्य‍ांनी व शेतकर्‍यांनी ऊपोषण सोडले आहे.

प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर अध्यक्ष महेश राऊत यांच्या नेतृत्वात २६ मार्च रोजी सकाळी १० वाजता तहसिल कारंजा कार्यालयासमोर आमरण ऊपोषणास सुरुवात करण्यात आली होती. या ऊपोषणांस शहरातील शेतकरी संघटना, माजी सैनिक संघटनांनी पाठिंबा देत युवा सामाजिक कार्यकर्ते प्रसाद देशमुख यांनीसुद्धा पाठिंबा दर्शविला होता. प्रशासनाने शेतकर्‍यांच्या समस्यांचे निराकारण न केल्यास आंदोलनास ऊग्र रुप प्राप्त होईल आणि त्यास सर्वस्वी प्रशासन जवाबदार असेन असा ईशारासुद्धा प्रसाद देशमुख यांनी दिला होता.

अखेर प्रशासन आणि कारंजातील प्रतिष्ठितांनी शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्याची हमी देत मध्यस्थी करत ऊपोषन सोडवले आहे. यावेळी कारंजा तहसिपचे तहसिलदार धीरज मांजरे, तालुका कृषी अधिकारी संतोष वाळके उपस्थित होते. तसेच
भाजप ऊप तालुकाध्यक्ष राजीव भेंडे आणि पत्रकार किरण क्षार यांनी याप्रकरणी मध्यस्थी केली. शेतकर्‍यांच्या समस्या शासनदरबारी मांडून त्यांना न्याय देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करु असे यावेळी सांगण्यात अाले. तसेच तहसिलदार धीरज मांजरे यांनी लेखी आश्वासनसुद्धा दिले.

प्रहार जनशक्ती पक्ष नेहमिच शेतकर्‍यांच्या मागण्यांसाठी लढत आला आहे आणि यापुढेसुद्धा लढत राहणार. प्रशासनाने दिलेल्या हमीमुळे आणि कारंजातील ऊपस्थित प्रतिष्ठितांच्या विश्वासामुळे आम्ही या ऊपोषणांस विराम देतो आहोत. मात्र शेतकर्‍यांवर अन्याय झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करु असे प्रहार शहरअध्यक्ष महेश राऊत यावेळी म्हणाले.