सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नांदेड जिल्ह्यात शेततलावाच्या अस्तरीकरणाचे बिल मंजूर करण्यासाठी शेतकऱ्याकडून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या कृषी पर्यवेक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. सोमवारी सायंकाळी पाच वाजता तालुका कृषी कार्यालयात ही कारवाई करण्यात आली.
संदीप सुभाष देशमुख असे लाच घेताना पकडलेल्या कृषी पर्यवेक्षकाचे नाव आहे.उपअधीक्षक बाळकृष्ण हानपुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र परदेशी व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.
सोमवारी सायंकाळी पाच वाजता कृषी कार्यालयात सापळा लावला. लाचेची रक्कम स्वीकारताच ‘एसीबी’ पथकाने संदीप देशमुखला झडप घालून पकडले. राज्यात सरकारी अधिकाऱ्यांमध्ये लाच घेण्याचे प्रमाण वाढत आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यसरकारने वेळीच योग्य पाऊल उचलणे आवश्यक आहे.