आयपीएलमध्ये दोन नव्या संघाकरिता अहमदाबाद फ्रेंचाईजी आणि पुणे, कानपुर व लखनौ या नावांची चर्चा

32

आगामी वर्षी एप्रिल-मे महिन्यात आयपीएलच्या १४व्या हंगामाचे नियोजन असून या टी-२० स्पर्धेत दोन नवे संघ घेण्यासाठी ‘बीसीसीआय’ने हालचाली सुरू केल्या आहेत. या दोन नव्या संघामध्ये अहमदाबाद फ्रेंचाईजी आणि पुणे, कानपूर व लखनौ या संघाच्या नावांची चर्चा आहे. तर फ्रेंचाइजीला घेण्यासाठी अदाणी ग्रुप व गोयंका ग्रुप उत्सुक असल्याचे समजते.

तीन नवीन संघ सदस्यांबरोबरच संघ निवड समिती अध्यक्षपदाबाबतही या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. ‘बीसीसीआय’च्या बैठकीत आंतराष्ट्रीय क्रिकेट परिषद आणि एशियन काऊन्सिलिंगच्या बैठकीसाठी नव्या प्रतिधिनीची निवड होणार आहे. यामध्ये ‘बीसीसीआय’चे सचिव जय शहा यांचे नाव सर्वात पुढे आहे. ‘बीसीसीआय’ने बैठक बोलवण्याआधी सर्व राज्य संघटनांना २३ मुद्दे पाठवले आहेत.

तसेच गांगुली आणि शहा याना आपल्या पदावर काम करण्यासाठी कार्यकाळ वाढवून देण्यात यावा याकरिता याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात ९ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. ‘बीसीसीआय’च्या वार्षीक सर्वसाधारण सभेत सर्व संलग्न राज्य संघटनांची मते जाणून घेण्यात येतील. त्यानंतर आगामी आयपीएलमध्ये नव्या संघांचा समावेश करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. अशी माहिती ‘बीसीसीआय’ अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिली.