अहमदाबाद विमान अपघात 2025: ड्रीमलाइनर विमान कोसळले Ahmedabad Plane Crash News in Marathi

131

अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळाजवळील मेघानी नगरमध्ये एअर इंडियाचे विमान दुर्घटनाग्रस्त; मोठी जीवितहानी टळली?

अहमदाबाद (१२ जून २०२५): अहमदाबाद विमान अपघातात आज सकाळी एक मोठी दुर्घटना घडली. एअर इंडियाचे लंडनकडे जाणारे ड्रीमलाइनर 787 विमान सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करत असताना अचानक मेघानी नगर परिसरात कोसळले. या विमानात २४२ प्रवासी होते, ज्यामुळे या घटनेने खळबळ उडवली आहे.

गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपानी विमानात असल्याची माहिती, प्रवासी विमान लंडनला जात होतं, टेक ऑफच्या १० मिनिटातच विमान कोसळलं

विमान अपघाताचे कारण काय?
प्राथमिक माहितीनुसार, अपघातामागे तांत्रिक बिघाड किंवा हवामानातील बदल कारणीभूत असू शकतात. अपघातानंतर विमानातून प्रचंड धूर आणि आगीचे लोळ उठले. प्रशासनाने त्वरीत बचावकार्य सुरू केले असून, दमकल दल, NDRF आणि पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

अहमदाबाद विमान अपघातात बचाव कार्य सुरू
अपघातग्रस्त भागात बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून, रुग्णवाहिका आणि वैद्यकीय पथके प्रवाशांना मदत करत आहेत. प्रवाशांची स्थिती जाणून घेण्यासाठी नातेवाईक विमानतळावर गर्दी करत आहेत.

प्रशासनाकडून तपासाची घोषणा
गुजरात सरकार आणि एअर इंडियाने या दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. दुर्घटनेचं नेमकं कारण शोधण्यासाठी विमान अपघात तपास यंत्रणाही सक्रिय झाली आहे.