वासिम जाफर वादावर अजिंक्य रहाणेंची प्रतिक्रिया

18

भारताचा माजी क्रिकेटपटू वासिम जाफर यांनी नुकतेच उत्तरखंड क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. वसीम जाफर याचे उत्तराखंड क्रिकेट असोसिएशनसोबत वाद झाल्यानंतर त्याने प्रशिक्षकपद सोडले. प्रशिक्षकपद सोडल्यानंतर वसीम जाफरवर असोसिएशनने गंभीर आरोप केले होते. वसीम जाफर यांच्यावर धर्मावर आधारीत संघ निवडीचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.

वसीम जाफरने टीममध्ये मुस्लिम खेळाडूंना प्राधान्य द्यायचे प्रयत्न केले, असे उत्तराखंडकडून सांगण्यात आले. वसीम जाफरने मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावले. याबाबत वसीम जाफरचा माजी सहकारी आणि टीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याला विचारण्यात आले, पण याबाबत रहाणेने प्रतिक्रिया देणं टाळले होते.

‘मला या प्रकरणाबाबत काहीही माहिती नाही. नक्की काय झालं आहे, याची कल्पना नसताना मी या विषयावर बोलणार नाही,’ असं अजिंक्य रहाणे म्हणाला आहे. जाफर आणि अजिंक्य रहाणे मुंबईकडून, वेस्ट झोन आणि इंडियन ऑईल कॉरपोरेशनकडून क्रिकेट खेळले आहेत दुसरीकडे अनिल कुंबळे, इरफान पठाण, मनोज तिवारी आणि मुंबईचे माजी क्रिकेटपटू शिशीर हट्टंगडी यांनी वसीम जाफरला पाठिंबा दिला आहे.