कोरोनावर प्रतिबंधात्मक लस आली असली तरिदेखील युरोपीय खंडातील काही देशांत पुन्हा कोरोनाचा ऊद्रेक बघायला मिळाला होता. आपल्याकडेसुद्धा ही परिस्थिती ऊद्भवू शकते. त्यामुळे अद्यापही काळजी घेणे फार जरुरी आहे. मात्र अजूनही काही लोकांना परिस्थितीचे गांभीर्य लक्षातच येत नाही. “आता ईथे बघा हे पठ्ठे मास्क न घालताच मोकाट फीरतायत, आता तुमच्यासमोर काय डोकं फोडून घेऊ का?” अशा आपल्या खास शैलीत अजितदादांनांनी अहमदनगर येथे मास्क न घातलेल्यांना खडे बोल सुनावले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मास्क न वापरणार्यांवर दादा चांगलेच चिडले. संकट अद्याप पूर्णपणे गेलेले नाही. सजग राहा , बेसावध राहणे आपल्यावरच उलटू शकते. त्यामुळे प्रत्येकानी स्वत:ची काळजी घेतली पाहिजे असे अजित पवार यावेळी म्हणाले.
यावेळी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे उपस्थित होते. यावेळी आयोजित सभेत बोलताना पवार यांनी करोना संकट आणि त्यामुळे राज्यावर ओढावलेले आर्थिक संकट यावर भाष्य केले.