आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. काल दिवसभरात वैधानिक विकास मंडळ या मुद्द्यवरुन विरोधातील भाजपने सत्ताधार्यांसमोर प्रश्न ऊपस्थित केले होते. आज वाढीव वीजबिलांवारुन भाजपने महाविकासआघाडीस घेरण्याचा प्रयत्न केला आहे. सभागृहाच कामकाज सुरु होण्यापुर्वी भाजप आमदारांनी वाढीव वीजबिलांवरुन विधिमंडळाच्या पायर्यांवर बसून जोरदार निदर्शने केली. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कामकाज सुरु होताच वाढीव वीजबिलांच्या मुद्द्यास हात घातला. परिणामी सभागृहात गोधळाची स्थिती निर्माण झाली. ऊपमुख्यनंत्री अजित पवार यांनी मध्यस्थी करत वीजबिलांबाबत महत्वाची घोषणा केली आहे.
महाविरणची प्रचंड थकबाकी आहे. या पार्श्वभूमिवर बील न भरणार्यांवर काही दिवसांअगोदर महावितरणने कडक कारवाई करण्यास सुरुवात केली होती. यामध्ये थेट वीज कापली जाण्याचे प्रकार घडत होते. वीज कापली जाण्यास भाजपचा विरोध आहे. यावरुनच देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नोत्तराचा तास तहकुब करुन वाढीव वीजबीलांवर चर्चा करावी अशी मागणी केली. आणि त्यानंतर सभागृहात गोधळाचे वातावरण निर्माण झाले होते. यादरम्यानच वीजतोडणीच्या कार्यक्रमास स्थगिती देण्यात येत असल्याची महत्वाची घोषणा करत अजित पवार यांनी मध्यस्थी केली. प्रसंगी दवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांचे आभार मानले.
मागील काही दिवसांपासून वाढीव वीजबीलांवरुन भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. कोरोनाच्या काळात ग्राहकांना मोठ्या प्रमाणात मुळ वापरापेक्षा अधिक रकमेचे बील देण्यात आले. बील न भरल्यास वीजतोडणीचा कार्यक्रमसुद्धा महाविरणने हाती घेतला होता. मात्र भाजपने यांस कडाडून विरोध केला होता. अगोदरच कोरोनामुळे सामान्य माणसाचे आणि शेतकर्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यात महाविरणची ही कारवाई जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. अशी भाजपकडून सातत्याने घेण्यात येत होती.
भाजपने वाढीव वीजबीलांवर राज्यव्यापी आंदोलनसुद्धा केले होते. महाराष्ट्रभरातील महाविरण कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात आला होता. यादरम्यान अनेक नेत्यांवर गुन्हेसुद्धा दाखल करण्यात आले होते.