राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणासाठी प्रयत्न केले नाही या नारायण राणे यांच्या टीकेचा अजित पवार यांनी समाचार घेतला.
मी रात्री झोपेत असताना वारंवार उठून बघतो सरकार पडले की काय? रात्रभर आलटून-पालटून हा चॅनल लाव… तो चॅनल बघ… असं सगळं माझं चालू असतं, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची खिल्ली उडवली.
तसेच मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे, ही साधी गोष्टदेखील त्यांना माहीत नाही का, अशीही विचारणा केली.
जोपर्यंत आमचे तीन पक्ष आणि त्यांचे नेते एकत्र आहेत तोपर्यंत कोणीही माईचा लाल हे सरकार पाडू शकत नाही, असे बजावले.