ईव्हीएम मशीनवर अजित पवार म्हणाले ……

10

ईव्हीएम मशीनवरुन देशात अनेकदा चांगलेच राजकारण तापले आहे. ईव्हीएम मशीनमध्ये घोळ असल्याचा आरोप कॉंग्रेस आणि केंद्रातील विरोधी पक्षांकडून नेहमिच होत असतो. यावरुनच काही दिवसांअगोदर कॉंग्रेसचे नेते नाना पटोले यांनी ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह ऊपस्थित केले होते. या प्रश्नाला अनूसरुनच अजित पवार यांना याबाबत विचारले असता ईव्हीएमवर माझा पुर्ण विश्वास असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

“ईव्हीएमवर कॉंग्रेसच्यावतीने सतत बोलले जाते. मात्र ईव्हीएमवर मतदान झाले असतांनासुद्धा राजस्थान आणि पंजाबमध्ये कॉंग्रेस सरकार निवडून आले आहे. बर्‍याचदा निवडणुकीत दारुण पराभव झाला असता, कार्यकर्त्यांनकडून ईव्हीएमवर शंका ऊपस्थित केली जाते. ईव्हीएम मशीनचे कार्य सध्या ऊत्तम सुरु आहे. पेपरलेस वर्क आहे आणि माझा तरी ईव्हीएमवर संपूर्ण विश्वास आहे” असे अजित पवार यावेळी म्हणाले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फेसुद्धा ईव्हीएमवर अनेकदा प्रश्नचिन्ह ऊपस्थित केले गेले आहे. त्यामुळे ईव्हीएमवर ऊपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेलीही प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरत आहे.