अजित पवार म्हणतात, ‘कोहिनूर-ए-गझल’ काळाच्या पडद्याआड गेला…

7

लोकप्रिय गझलकार इलाही जमादार यांच्या निधनाने मराठीतील ‘कोहिनूर-ए-गझल’ काळाच्या पडद्याआड गेला आहे. गझलरसिकांचा महानायक हरपला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

इलाही जमादार यांनी मराठी गझलरसिकांच्या हृदयसिंहासनावर अधिराज्य केलं. मराठी साहित्यविश्व समृद्ध केले. इलाही जमादारांच्या गझला  साहित्यरसिकांना यापुढेही कायम आनंद देत राहतील. त्यांचं निधन ही गझलविश्वाची मोठी हानी आहे. मी इलाही जमादार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. असे अजित पवार म्हणाले.

इलाही जमादार यांच्या अनेक गझला रसिकांच्या कायम ओठांवर असतात. मराठी गझल विश्वातील उंचीवर पोहचले गेलेल्या मोजक्या गझलकार मंडळीतील इलाही हे मोठं नाव होतं. त्यांच्या जाण्याने मराठी साहित्यात पोकळी निर्माण झाली आहे. अशा भावना अनेक मान्यवरांनी व्यक्त केल्या आहेत.