हिवाळी अधिवेशनामध्ये दुसऱ्या दिवशी सभागृहात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही काल अनेकांच्या प्रश्नांना तुफान उत्तरे देत दिली. मात्र यावरून आता भाजपचे नेते खासदार निलेश राणे यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. राजकारण सोडून शेती करणार होता त्यांचं काय झालं? असा प्रश्न निलेश राणे यांनी अजित पवारांना विचारला आहे.
अजित पवार यांनी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान केलेल्या एका वक्तव्याचा संदर्भ देत निलेश राणे यांनी अजित पवार यांना शेती करण्यासंदर्भातील त्यांच्या जुन्या वक्तव्याची आठवण करुन दिली आहे. निलेश राणे म्हणाले, कि तीन पक्षाचे सरकार आले आणि हातातोंडाचा घास गेल्याने दुःख झालंय असे अजित पवार बोलले. पवार साहेब तुम्ही पत्रकार परिषदेत रडता, मोबाईल बंद करून लपून बसता, बिनखात्याचे ३ महिने मंत्री राहण्याचा मान पण तुमचाच. तुम्ही इतके दुःखात होतात की राजकारण सोडून शेती करणार होतात त्याचे काय झाले? असा ट्विट निलेश राणेंनी केले आहे.